स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी, सबमर्सीबल, सोलर पंप चोरटे गजाआड

---Advertisement---

 

जळगाव : एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळ सबमर्सीबल आणि सोलर पंप यांची चोरी झाली होती. यात ट्रकमधून 2 लाख 35 हजार रुपये किमतीचे सबमर्सीबल आणि सोलर पंप चोरट्यांनी ट्रकमधून चोरुन नेले होते.याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली असून त्यांना एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आकाश लालचंद मोरे, भरत बाबुराव बागुल, पृथ्वीराज रतीलाल पाटील असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

या चोरीप्रकरणी 31 मे 2025 रोजी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. एरंडोल तालुक्यातील उमरदे या गावाजवळ रस्त्यावर घडलेल्या या चोरीच्या घटनेत 2 लाख 35 हजार रुपये किमतीचे सबमर्सीबल आणि सोलर पंप चोरट्यांनी ट्रकमधून चोरुन नेले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.

गुप्त बातमीदारासह तांत्रीक विश्लेषणाच्या माध्यमातून हा गुन्हा आकाश लालचंद मोरे (रा. मुगपाठ पदमालय) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती निष्पन्न झाली होती. त्या माहितीच्या आधारे आकाश यास नागदुली गावाजवळ असलेल्या पदमालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

हा गुन्हा त्याने भरत बाबुराव बागुल, पृथ्वीराज रतीलाल पाटील, पंकज रवि बागुल यांच्या साथीने केला असल्याचे त्याने कबुल केले. त्या माहितीच्या आधारे तपासाअंती आकाश लालचंद मोरे, भरत बाबुराव बागुल, पृथ्वीराज पाटील असे तिघे पोलिस पथकाच्या हाती लागले. त्यांना एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे, हे.कॉ. संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोकों राहुल कोळी, दिपक चौधरी यांच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---