---Advertisement---
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाळीसगावातील एका माजी नगरसेवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगावातील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते व माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर हा हल्ला झाला आहे. चौधरी यांच्या कार्यालयाचे दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महजान यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
दरम्यान, काल रात्री चौधरी यांना एकटं गाठून, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चाळीसगावमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळ्याच्या एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे, मात्र हा हल्ला राजकीय हेतूने होता की दुसरे काही कारण होते, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याबाबतचा तपास करण्यात येत आहे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध
याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असल्याची माहिती समोर आली आहे.
चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा चाळीसगावातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.