---Advertisement---
जळगाव : इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी असलेल्या शासनाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत भांडी न मिळाल्याने दगड फेक झाल्याची घटना समोर आली आहे.
अडावद येथे काहींनी भांडी वाटप करण्यात येणाऱ्या इमारतीवरच दगड मारल्याने वातावरण चांगलेच तापले. अडावद येथील वडगाव रस्त्यावरील सभागृहात हा राडा झाला. वेळीच अडावद पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. भांडी वाटपाचा कार्यक्रम असताना लाभार्थी तळ ठोकून असताना मात्र, संबंधित या ठिकाणी फिरकलेच नाही. यामुळे लाभार्थानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनेचा आढावा घेत, लाभार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तरीही हा गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला.
यावेळी ठेकेदार मनोहर बाविस्कर, मानदीप सिंग, मनोज सपकाळे, शुभम सोनवणे, सोनाली बाविस्कर, मनोज ठाकरे हे उपस्थित होते. लाभार्थी पहाटेपासून नंबर लावून बसले होते; परंतु दिवसभरात कुणीही फिरकले नाही.