Video : उद्घाटनापूर्वीच पाळधी-तरसोद बायपासने घेतले दोन बळी, नेमकं काय घडलं?

---Advertisement---

 

जळगाव : पाळधी ते तरसोद बायपास महामार्गाचे उद्घाटन होण्यापूर्वीच दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेत एस. के. मौलाली (४०, रा. एरुपालम, जि. खंमत, तेलंगणा) हा चालक तर दुसऱ्या ट्रकचा चालक असे दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

गुजरातमधील मोरबी येथून खाकीनाडा (आंध्र प्रदेश) येथे टाईल्स घेऊन जाणारा ट्रक (क्र. एपी ३९, युएफ ३५९९) पाळधी ते तरसोद बायपासवरून जात असताना समोरुन भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. जी.जे. १६, एवाय ००७८) ओव्हरटेकच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, दोन्ही ट्रकच्या केबिनचा पूर्णपणे चुराडा होऊन त्या एकमेकांमध्ये अडकल्या.

धडक देणाऱ्या ट्रकमध्ये कोळसा होता. धडकेनंतर त्यातील कोळसा समोरील ट्रकवर जाऊन पसरला होता. शिवाय ट्रकच्या केबिनचा चुराडा झाल्याने दोन्ही ट्रकचे चालक व एका ट्रकच्या क्लिनरला काढण्यासाठी दोन ते अडीच तास लागले.

ट्रकमधील कोळसा जेसीबीच्या सहाय्याने उपसण्यात आला व त्यानंतर ट्रक मागे ओढून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. एक गंभीर आहे. टाईल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक एस. के. मौलाली हा ठार झाला.

एकेरी मार्गाने वाहतूक सुरू असताना अपघात

बायपासचे उद्घाटन होणे बाकी आहे. त्यापूर्वी चाचणी म्हणून एक बाजू वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. यात दोन्ही बाजूने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू असताना हा अपघात झाला. घटनास्थळी तालुका पोलिसांनी जाऊन बचावकार्य करण्यासह वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---