अत्याधुनिक मशनरीच्या सहाय्य्यने बनवायचे दारू, पोलिसांनी केला कारखानाच उध्वस्त

---Advertisement---

 

जळगाव : पारोळा तालुक्यात एका बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर जळगाव पोलिसांनी धाड टाकून तो उद्धवस्त केला. ही कारवाई बहादरपूर शिवारात, बोरी नदीच्या काठावर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४० लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बनावट देशी दारू कारखान्याबाबत पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा छापा टाकला. ‘टँगो पंच’ या नावाने बनावट देशी दारूची निर्मिती आणि पॅकिंग या ठिकाणी सुरू होती.

पोलिसांनी धाड टाकल्यावर त्यांना तयार दारूचे बॉक्स आणि बाटल्या आढळून आल्यात. बनावट दारु बनविण्यासाठी कच्चा माल (स्पिरिट) आणि रसायने तेथे होते. यासोबतच बाटली पॅकिंग आणि सीलिंगसाठी लागणारी अत्याधुनिक मशिनरी देखील दिसून आली. तसेच दोन मालवाहू गाड्या ( स्विफ्ट डिझायर आणि बोलेरो) जप्त करण्यात आल्या. येथे हजारो रिकाम्या बाटल्या, बूच आणि पॅकेजिंग साहित्य आढळले.

या प्रकरणी राकेश जैन, टिंन्या डोंगऱ्या पावरा आणि कतार सिंग पावरा या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---