स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; फरार आरोपीस केली शिताफीने अटक

---Advertisement---

 

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गंभीर गुन्हा दाखल असलेला आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) असे आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीस तात्काळ अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शरद बागल व श्रे. पोउपनि रवि नरवाडे यांच्या पथकाने तपास सुरू केला.


बुधवार (२७ ऑगस्ट ) रोजी गुप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपी फैजपूर येथील हॉटेल हॉटस्पॉट येथे असल्याची खात्री करण्यात आली. यानंतर एलसीबी पथकाने फैजपूर पोलीसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व फैजपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने केली.

कारवाईत पोउपनि शरद बागल, श्रे. पोउपनि रवि नरवाडे, पोहेकों गोपाळ गव्हाळे, पोहेका उमाकांत पाटील, पोकों विकास सातदिवे, पोकों प्रशांत परदेशी, पोकी राहुल वानखेडे (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) तसेच फैजपूर पो.स्टे. येथील सपोनि रामेश्वर मोताळे, पोउपनि मैनुद्दीन सैय्यद, पोकों जुबेर शेख आदींचा सहभाग होता

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---