संतापजनक ! वाहकाने भरपावसात उतरविले खाली, विद्यार्थी तीन किलोमीटर पायपीट करीत पोहोचला घरी

---Advertisement---

 

जळगाव : नागरिक प्रवासासाठी एसटी बसला प्राधान्य देत असतात. एसटीचा प्रवास हा सुरक्षितपणाचा मानला जातो. या धारणेला तडा जाणारी घटना घडली आहे. एसटी बसने प्रवास करतांना काही वाहक अरेरावी भाषा वापरतात असे आरोप करतांना प्रवाशी दिसतात. सर्वसाधारण व्यक्ती बसने प्रवास करीत असतो. याच प्रमाणे शाळकरी मुलंमुली देखील बसने अपडाऊन करतात. ते यासाठी मंडळाची मासिक पास योजनेचा लाभ घेत असतात.

प्रवास दरम्यान प्रवाशांची जबाबदारी चालक वाचकांची यांच्यावर असते. याउलट प्रवास पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्यांला एसटी बस वाहकाने भरपावसात खाली उतरवल्याची घटना घडली आहे. यानंतर त्या विद्यार्थ्याला दोन ते तीन किलोमीटर पायी चालत जाऊन आपले घर गाठावे लागले. याप्रकाराने सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. चोपडा तालुक्यातील उनपदेव अडावद येथील बादल राजाराम बारेला (रा. उनपदेव) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

बादल हा विद्यार्थी पाचवीच्या वर्गात आहे. मंगळवारी (१९ ऑगस्ट)ला सकाळी चोपडा बसने शाळेत जाण्यासाठी निघाला. परंतु त्याच्याकडील मासिक पास १७ ऑगस्टला संपली होती. बस वाहकाने त्याला तिकिटाविषयी विचारणा केली असता. पास संपल्याचे त्याने सांगितले. यावर वाहकाने त्याला अपशब्द वापरले आणि एका ठिकाणी थांबवून भरपावसात खाली उतरवले. पावसात भिजत हा विद्यार्थी दोन ते तीन किमी पायी चालून उनपदेवनजीक पाड्यावर आपल्या घरी परतला.

वाहकाने शाळकरी मुलाला भरपावसात बेजबाबदारपणे उतरवले घडल्याची बाब समोर येताच घटनेविषयी कर्जाणे येथील उपसरपंच प्रमोद बारेला आणि बिरसा ब्रिगेड सातपुडाचे अध्यक्ष रामदास पावरा यांनी चोपडा येथील आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---