---Advertisement---
नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंम सेवासंघ प्रमुख मोहन प्रमुख भागवत यांनी लोकसंख्या धोरणावर वक्तव्य होतांना ‘हम दो आणि हमारे तीन’ धोरण लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे. संघाला शतक पूर्ण झाल्यानिमित्त्त आयोजित कार्यक्रमांत ते बोलत होते.
घटत्या जन्मदराबाबत विचार करण्याची गरज मोहन भागवत यांनी व्यक्त केली. ज्यांचे जन्मदर प्रमाण ३ पेक्षा कमी आहे ते हळूहळू नामशेष होऊन जातात, असे जगातील सर्व शास्त्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे, ते बोलत होते.
लग्नाला उशीर न करणे आणि तीन अपत्ये जन्माला घालणे हे आई-वडील व अपत्याच्या आरोग्यासाठी चांगले असते. डॉक्टर नेहमी मला याबाबत सांगत असतात, असे संघप्रमुख म्हणाले. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांनी तीन अपत्यांबाबत विचार केला पाहिजे. परंतु तीन अपत्यांचा खर्चदेखील उचलावा लागेल. त्यामुळे तीनहून अधिक मुलांचा विचार करू नका, असे ते म्हणाले.
सर्वांचे जन्मदर कमी होत आहेत. हिंदूंचा जन्मदर अगोदरच कमी होता. त्यात आणखी घट होत आहे. त्यामुळे तीन अपत्यांपेक्षा कमी मुले नको, असे धोरण नवीन पिढीने स्वीकारण्याची गरज मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.