महिलेच्या गळ्यातील मंगलापोत चोरट्यांनी धूम स्टाईलने लांबवली

---Advertisement---

 

जळगाव : शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असाच प्रकार शहरातील टिळक नगरात घडला आहे. एक वृद्ध महिला मंदीरातून पूजा करुन घरी जात होती. यावेळी त्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगलपोत अज्ञात दोन चोरट्यांनी धूम स्टाईलने लंपास केली.

त्या दोघा चोरट्यांनी दुचाकीवर येवून जबरदस्तीने हिसकावून घेत चोरून नेल्याची घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास टिळक नगरात घडली आहे. याबाबत बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा अर्जुनराव जाधव (वय ७६ रा. मयुरेश्वर कॉलनी, जळगाव) या वृध्द महिला मंगळवारी ( २६ ऑगस्ट ) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या मैत्रीणीसोबत मंदीरातून घरी परत जात होत्या. तेव्हा टिळक नगरातील रस्त्यावर अज्ञात दोन चोरटे हे दुचाकीवर आले. एकाने त्यांच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची अडीच तोळ्याची सोन्याची पोत जबरी हिसकावून धुमस्टाईल चोरून नेली.

हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली तोपर्यंत चोरटे हे दुचाकीवरून पसार झाले. याबाबत त्यांनी बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---