---Advertisement---
जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट मध्ये नवीन १७ सदस्यांचे स्वागत करण्यात आले. हा स्वागत सोहळा नव्हे तर उत्सव आहे, असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे इव्हेंट सेक्रेटरी निलेश परतानी यांनी केले.
मायादेवी नगरातील रोटरी भवन मध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष संदीप झंवर, सहसचिव धर्मेंद्र भैय्या, प्रेसिडेंट एन्क्लेव्ह जितेंद्र ढाके, सहप्रांतपाल डॉ. अपर्णा भट कासार आदी उपस्थित होते.
रोटरीचे संस्थापक पॉल हॅरीस यांचे व्हिजन सांगून रोटरीच्या १२० वर्षांच्या परंपरेची परतानी यांनी माहिती दिली. रोटरीच्या मूलतत्त्वांची जोपासना करत नवीन सदस्य झालेल्या प्रतिभावंत व्यक्तींनी तन, मन, धनाने सेवाकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी सुरेश मंत्री, संजय लाठी, डॉ. सुषमा पाटील, स्वाती सोमाणी, मिलन सतरा,महेंद्र झंवर, पवन तापडिया, संतोष झंवर, सोनाली मंडोरा, सुनील भुतडा, कौशल पलोड, सरल चोपडा, सुनील भंगाळे, बिना चौधरी, मुकेश राठी, रमेश मुंगड, दिनेश तिवारी यांचे कुटुंबीयांसह रोटरी पिन देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० कडून गेल्या वर्षी रोटरी जळगाव इलाईट क्लबने अध्यक्ष ओमप्रकाश सिंग यांच्या नेतृत्वात केलेल्या कार्याबद्दल मिळालेल्या सात अवॉर्ड आणि डिस्ट्रिक्टतर्फे बेस्ट सेक्रेटरी अवॉर्ड विजेते संजय तापडिया तसेच लक्ष्मीकांत मणियार, डॉ. पंकज शाह यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी चार्वी झंवर व आराध्या राठी यांनी नृत्यद्वारे गणेश वंदना व देशभक्तीपर गीत सादर केले. सूत्रसंचालन संजय तापडिया व समृद्धी रडे यांनी केले. आभार डॉ. शितल भोसले यांनी मानले.