जळगावात मोफत आरोग्य शिबिर उत्सहात

---Advertisement---

 

जळगाव : शहरात तुकाराम वाडी येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा सेवा विभाग यांचे मार्फत नुकतेच मजदूर अनमोल मित्र मंडळ येथे गणपती उत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जनरल तपासणी करण्यात आली. जवळपास 80 रुग्णांची तपासणी या ठिकाणी झाली. या तपासणी दरम्यान काही रुग्णांचे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून मदत केली जाणार आहे.

या शिबिरासाठी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉ. हितेंद्र युवराज गायकवाड आणि सहसेवा प्रमुख दीपक दाभाडे, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी जळगाव कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी, उत्तर महाराष्ट्र समन्वयक डॉ. अजित विसपुते आणि डॉ. सुमित जैन यांनी संपूर्ण नियोजन केले होते.

या शिबिरात विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी, विभाग सहमंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे, हरीश कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---