---Advertisement---
Gold-Silver Price Today : जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ते एक लाख पाच हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीच्या भावात दोन हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख २३ हजार ७०० रुपयांवर पोहोचली आहे. परिणामी यामुळे दागिने खरेदीच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
२३ ऑगस्ट रोजी सोने एक लाखाच्या पुढे गेले. ३० ऑगस्टपर्यंत ते एक लाख चार हजार रुपयांवर पोहोचले त्यानंतर आठवड्याच्या व नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी, १ सप्टेंबर रोजी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने एक लाख पाच हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. चांदीच्याही भावात थेट दोन हजार २०० रुपयांची वाढ झाली व ती एक लाख २३ हजार ७०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत काय आहेत सोन्याचे दर
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने १,०६,२४० रुपयांवर, २२ कॅरेट सोने ९७,४०० रुपयांवर आणि १८ कॅरेट सोने ७९,६९० रुपयांवर पोहोचले आहे.
आर्थिक राजधानी मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुण्यामध्ये २४ कॅरेट सोने १,०६,०९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने उपलब्ध आहे. तर, चेन्नई, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुण्यामध्ये २२ कॅरेट सोने ९७,२५० रुपयांवर पोहोचले आहे.