रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता भुसावळ विभागातील ‘या’ स्थानकांवर अतिरिक्त थांबा

---Advertisement---

 

भुसावळ : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थात भुसावळ विभागातील भादली व देवळाली स्थानकांवर काही गाड्यांना प्रयोगिक तत्त्वावर अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे.

३ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणारे थांबे

गाडी क्र. ५९०७५ नंदुरबार- भुसावळ पॅसेंजर : भादली येथे थांबा, आगमन वेळ सायंकाळी ६:४९. गाडी क्र. ५९०७६ भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर भादली येथे थांबा, आगमन वेळ सकाळी ९:१३.

कुशीनगर एक्स्प्रेसला देवळाली येथे थांबा

याशिवाय १२८०९ व १२८१० क्रमांकाचा हावडा मेल आणि २२५३७व २२५३८ क्रमांकाच्या कुशीनगर एक्स्प्रेसला देवळाली येथे थांबा देण्यात आला आहे.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे या भागातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. याशिवाय १२८०९ व १२८१० क्रमांकाचा हावडा मेल आणि २२५३७व २२५३८ क्रमांकाच्या कुशीनगर एक्स्प्रेसला देवळाली येथे थांबा देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---