लग्नानंतरही घेतला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ; कुटुंबातील आठ सदस्यांविरोधात गुन्हा दाखल

---Advertisement---

 

पाचोरा : मुलीचे लग्न झाल्यानंतर शिधा पत्रिकेतून तिचे नाव कमी न करता कुटुंबातील इतर सदस्यांनी अन्न सुरक्षा योजेनचा लाभ घेतल्याचा प्रकार पिपळगाव हरेश्वर घडला आहे. याबाबत तक्रार आल्यानंतर कुटुंबांतील आठ सदस्यांविरोधात पिंपळगाव पोलिसात शासनाची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तहसील कार्यालय येथे निलेश नामदेव उभाळे ( रा. भोजे ता. पाचोरा) यांचेतर्फे 7 नोव्हेंबर 2023 रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यात त्यांनी शंकर माधव क्षिरसागर, मुक्ताबाई शंकर क्षिरसागर, अमोल शंकर क्षिरसागर, कविता शंकर क्षिरसागर, पंडीत धनु माळी (सर्व, रा.पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) यांच्या विरोधात तक्रार दिली होती.

क्षिरसागर कुंटुबातील सदस्य कविता शंकर क्षिरसागर हीचे 2012 मध्ये लग्न झाले आहे. ती लग्न करुन सासरी गेल्यावर सुद्धा क्षिरसागर कुटुंबाने तिच्या नावाचे रेशनावरील धान्याचा लाभ घेणे सुरु ठेवले आहे. क्षिरसागर कुटुंबाला कविता हिच्या हिस्साचा शासनाचा अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेण्याचा कोणताही अधिकार नसतांना शिधा पत्रिका क्र 272026780867 वरील कुंटुबातील सदस्यांचे नावे प्राधान्य कुटूंब योजनेमध्ये नमुद आहेत. असे असतांना कुटूंबातील शंकर माधव क्षिरसागर, मुक्ताबाई शंकर क्षिरसागर, अमोल शंकर क्षिरसागर, कविता शंकर क्षिरसागर, पंडीत धनु माळी यांनी शासनाचा अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेवुन शासनाची फसवणुक केली आहे.

तसेच 26 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या तक्रार अर्जानुसार पुरवठा निरिक्षक त. का. पाचोरा यांनी चौकशी केली आहे. हा चौकशी अहवाल पाचोरा तहशिलदार यांना पाठविला असता, या अर्जाचा चौकशी अहवाल उपविभागिय अधिकारी पाचोरा यांना पाठविला असता त्यांनी शंकर माधव क्षिरसागर, मुक्ताबाई शंकर क्षिरसागर, अमोल शंकर क्षिरसागर, कविता शंकर क्षिरसागर, पंडीत धनु माळी (सर्व,रा. पिंपळगांव हरे ता. पाचोरा) तसेच प्रदीप माधव क्षिरसागर, मनिषा प्रदीप क्षिरसागर, भुषण प्रदिप क्षिरसागर ( सर्व रा. पिंपळगांव हरे ता. पाचोरा) यांच्या विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी असा लेखी आदेश 7 जुलै /2025 रोजी उपविभागीय अधिकारी पाचोरा यांनी दिल्याने या आदेश दिले. या आदेशानुसार पुरवठा निरीक्षण अधिकारी सुषमा उरकुडे यांनी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर)पोलिसात फिर्याद दाखल केल्याने वरील आठ आरोपींताविरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---