---Advertisement---
बिहारमध्ये दरभंगा येथे काँग्रेस-राजदतर्फे मतदार हक्क रॅली काढण्यात आली. या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल आपत्तीजनक शब्द वापरण्यात आले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२ सप्टेंबर) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगतिले की, बिहार समृद्ध परंपरांनी नटलेले राज्य आहे. या राज्यात अशी परिस्थिती उद्भवेल, जिथे आईचा सन्मान दुखावला जाईल, अशी त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आई ही आपले विश्व असते, आई ही आपल्यावर संस्कार करते. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जे घडले, त्याची मी कल्पनाही देखील केली नव्हती, ना बिहारच्या कोणत्याही भावाने, ना बहिणीने त्याची अशी कल्पना केली असेल, इतकेच नाही तर भारतातील कोणत्याही नागरिकाने अशी कल्पना केली नसेल.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, बिहारमध्ये राजद-काँग्रेसच्या कार्यक्रमात त्यांच्या आईबाबत आपत्तीजनक वक्तव्य करण्यात आले. हा अपमान केवळ त्यांच्या आईचा नसून संपूर्ण देशातील माता, बहिणी आणि मुलींचाही अपमान आहे. भारतातील प्रत्येक आई, बहीण आणि मुलीचा अपमान आहे. मला माहित आहे की माझ्या हृदयात जे दुःख आहे तेच दुःख बिहारच्या लोकांच्या हृदयात आहे. प्रत्येक आई आणि मुलीच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.
जनतेशी भावनिक संबंध जोडताना पंतप्रधान म्हणाले की, बिहारच्या परंपरेत आईचा आदर सर्वात महत्वाचा आहे आणि असे अपमानजनक शब्द ऐकून संपूर्ण देशात संताप व्यक्त होतो. ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीत आईला देवतेचा दर्जा देण्यात आला आहे आणि असे शब्द आपल्या सभ्यता आणि संस्कृतीवर हल्ला आहेत.
---Advertisement---
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मला माहित आहे की तुम्ही सर्वजण, बिहारची प्रत्येक आई, बिहारची प्रत्येक मुलगी आणि बिहारचा प्रत्येक भाऊ किती वाईट वाटले. मला माहित आहे की तुम्हालाही माझ्याइतकेच दुःख झाले. जेव्हा इतक्या माता आणि बहिणी माझ्यासोबत आहेत, तेव्हा आज मी हे दुःख तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे, जेणेकरून मी ते सहन करू शकेन.