---Advertisement---
भुसावळ : दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दोन विशेष उत्सव गाड्या विविध मार्गावर धावणार असून, एकूण ४० विशेष फेऱ्यांचे संचालन करण्यात येणार आहे.
हडपसर वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन
-गाडी क्र. ०१९२५ : २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर गुरुवारी हडपसरहून दुपारी ३:१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता झाशी येथे पोहोचेल. गाडी क्र. ०१९२६ २४ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर बुधवारी झाशीहुन दुपारी वाजता १२. ५० सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाड्या दौड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ खडवा, राणी कमलापती, विदिशा, बीना आणि ललितपूर येथे थांबतील.
साईनगर शिर्डी बिकानेर साप्ताहिक गाडी
-गाडी क्र. ०४७१६: २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर रविवारी सायंकाळी ७:३५ वाजता शिर्डीहून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता बिकानेर येथे पोहोचेल, तर गाडी के ०४/०१५-२० माटेंबर ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर शनिवारी दुपारी १:३० वाजता बिकानेरहून सुटुन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता शिर्डी येथे पोहोचेल.
या गाड्यांना मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाल, उज्जैन, नागदा, कोटा, जयपूरसह राजस्थानमधील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.