---Advertisement---
GST News : जीएसटी काऊन्सिलची बुधवार (3 सप्टेंबर) रोजी 56 व्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत 5% आणि 18% या दोन टॅक्स स्लॅबना मंजूरी देण्यात आली आहे. आता देशात फक्त हे दोनच स्लॅब्स असणार आहेत. या बैठकीत अनेक जीवनाश्यक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. यासोबतच ३३ जीवनरक्षक औषधांवरील १२ टक्के रद्द करण्यात आला आहे. म्हणजेच तो शून्य करण्यात आला आहे. कॅन्सरच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांवरील जीएसटी देखील शून्य केला आहे.
आजच्या काळात अनेक गंभीर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार करणे खूप महाग आहे. या औषधांवरील जीएसटी रद्द केल्याने गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या परिवाराला थेट आर्थिक लाभ होणार आहे. महागडी औषधे घेण्यास अडचणी येत असलेल्या कुटुंबांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.
अशा औषधांवरील जीएसटी 12% वरून शून्य करण्यात आला आहे, ज्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळू शकेल. या औषधांवर जीएसटी नसल्याने आता उपचारांचा खर्च कमी होईल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना स्वस्त दरात उपचार मिळू शकतील.
हा नवा नियम सोमवार 22 सप्टेंबरपासू लागू केला जाणार आहे. त्यानंतर देशभरात या औषधांच्या खरेदीवर कोणताही जीएसटी भरावा लागणार नसून यामुळे ही औषध विकतं घेणं थोड स्वस्त होणार आहे. या 33 औषधांमध्ये कर्करोग, रक्त विकार, दुर्मिळ अनुवांशिक आजार आणि इतर गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या औषधांचा समावेश करण्यात आला आहे.