---Advertisement---
तळोदा : तालुक्यातील सातपुडा पाथ्या लगत येणाऱ्या चौगांव खु. ग्रामपंचायत अंतर्गत येणारे दुर्गम भागातील चिडमाळ गावातील ग्रामस्थांना रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच गावातील गरोदर स्त्रीला प्रसूती वेदना होऊ सुरु झाल्याने पुढील उपचाराठी तीला दवाखान्यात नेणे गरजेचे होते. या गावाला रस्ता नसल्याले त्या महिलेला नातेवाईक, गावकऱ्यांनी बाबूच्या झोळीतून चार ते पाच किलोमिटर पायपीट करत तीला दवाखान्यात दाखल केले.
बुधवार दि ३ ऑगस्ट रोजी चिडमाळ येथील सविता कात्या वळवी ह्या गरोदर महिलेला प्रसूती पूर्व वेदना सुरु झाल्या. तीला पुढील उपाचार्थ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. गावात रस्ता नसल्याने वाहनातून तीलानेणे शक्य नव्हते. यावेळी तील गावातील नागरीक व नातेवाईक यांनी बाबूची झोळी करून चार ते पाच किलोमिटर डोंगरदऱ्यात पायपीट करुन माळ खूर्द पर्यन्त आणले.
पुढे वाहानातून तळोदा जिल्हा उप रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. चिडमाळ गावातील लोकांना रस्ता नाही म्हणून वारंवार निवेदन देऊन सुद्धा रस्ता होत नाही म्हणून अनेक अडचणीना समोर जावे लागत आहे. रस्ता व्हावा यासाठी गावकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.