---Advertisement---
जळगाव : घरगुती सिलिंडरचा बेकायदेशीरपणे साठा करून त्यातील गॅस खासगी वाहनात भरण्याच्या अवैध व्यवसायावर एलसीबी पथकाने छापा टाकला. या छाप्यात तब्बल ५२ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. घरगुती गॅस हंड्या वाहनात भरुन या हंडीतून वाहनात गॅस भरण्याचा संशयितांचा प्लॅन होता. एलसीबी पथकाने तपासचक्र फिरवित घरगुती ५२ सिलिंडर गॅस हंडी, इलेक्ट्रीक म ोटार, वजन काटा, मशिन, वाहन असा सुमारे ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई ४ सप्टेंबरला तांबापुरा ते इच्छादेवी चौक दरम्यान करण्यात आली.
तक्रारीनुसार (एमएच १९ सीएक्स १०७५) या वाहनात एचपी कंपनीच्या ५२ त्यात दोन भरलेल्या व ५० खाली गॅस हंडी तसेच आठ भारत गॅस कंपनीच्या भरलेली हंडी वाहनात ठेवल्या होत्या. हंडीमधील गॅस वाहनात भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार, वजन काटा, गॅस भरण्याची मशिन असे साहित्य ठेवले होते. ही माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत तपासाला गती दिली. दोन संशयित वाहनासह इच्छादेवी चौकात मिळाले. हा मुद्देमाल हस्तगत केला.
याप्रकरणी तक्रारीनुसार अनिल शंकर सोनवणे (वय ४५, रा.बांभोरी), मोहन शेख युसुफ शेख (रा.तांबेपुरा इच्छादेवी चौफुलीजवळ) यांच्या विरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार सुनील लोहार हे तपास करीत आहेत.