---Advertisement---
Sports: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा आजपासून होत आहे. पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दोन षटकात कांगारू संघाला मोहम्मद सिराजने पहिला धक्का दिला आहे.
या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अष्टपैलू हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. वनडे फॉरमॅटमध्ये हार्दिक पांड्या कर्णधारपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे तर ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या जागी फलंदाज स्टीव्ह स्मिथ या मालिकेत नेतृत्व करत आहे.