---Advertisement---
मोटरसायकल ही विविध श्रेणीत विभागलेली असते. बजेट अभावी काही जण मोटारसायकल खरेदी करण्याचा प्लॅन पुढे ढकलत असतात. तसेच मोटसायकलमधील आपल्या आवडत्या मॉडेल करीत प्रतीक्षा करावी लागते. सध्याच्या घडीला पहिलं कारण देत बाईक खरेदी लांबणीवर टाकणाऱ्यांना आता हे कारण देण्याचीसुद्दा मुभा नाहीय. कारण, बाईक मोठ्या फरकानं स्वस्त झाल्या आहेत.
मोटरसायकलचे दर मोठ्या फरकाने कमी झाले आहेत. जीएसटी कर प्रणालीत मोठ्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत. जीएसटी बदलांनंतर संपूर्ण ऑटोमोबाईल क्षेत्रावरच याचे परिणाम दिसत आहेत. प्रामुख्यानं मोटारसायकलच्या दरातही लक्षणीय घट दिसत आहे.
मध्यमवर्गीयांमध्ये सर्वांच्या पसंतीस उतरणाऱ्या 350 सीसीहून कमी इंजिनच्या बजाज, होंडा, टीव्हीएस, यामाहासारख्या दुचाकीसह स्कूटरच्या दरातही मोठी घट झाली आहे.
Royal Enfield च्या क्लासिक आणि हंटर यांसारख्या किमतींवरही काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र प्रिमियम बाईकच्या बाबतीत मात्र दिलासा मिळाला नसून त्यांच्या किमती काहीशा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. एका प्रसिद्ध वृत्तसमुहानुसार रॉयल एनफिल्डच्या शहरी भागांमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या हंटर 350 बाईकची किंमत 1,49000 वरून 1,34,910 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच या बाईकचे दर साधारण 14000 रुपयांहून अधिक किमतीनं कमी झाले आहेत. तर, क्लासिक 350 च्या दरात 19300 रुपयांची घट झाली आहे. असं असलं तरीही हिमालयन 450, गुरिल्ला 450, इंटरसेप्टर 650, कॉन्टीनेंटल जीटी 650, एनफिल्ड बेअर 650, सुपर मिटीऑर 650 या बाईकच्या दरांत 27000 ते 35000 रुपयांची वाढ झाली आहे.









