पत्नीसोबत सुरतला ड्रग्ज तस्करी करणाऱ्याला अटक

---Advertisement---

 

जळगाव : पत्नीसोबत सुरतला ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ट्रक चालक एजाज उर्फ छोटीया उस्मान शेख (रा. जळगाव) याच्या ड्रग्स तस्करी करणाऱ्यापुर्वी सुरत शहर गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. एजाज हा उमरवाडा येथील सलीम नगरातील झोपडपट्टीत ड्रग्जची तस्करी करणार होता.

या कारवाईचे धागेदोरे जळगावपर्यंत पोहचल्याने रविवारी गुजरात पोलीस जळगावात आले होते. त्यांनी संशयिताने दिलेल्या माहितीच्या आधारावर मास्टर कॉलनीतील त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर पथकाने शाहूनगरात जावून पाहणी केली. जळगावातील ट्रक चालक एजाज उर्फ छोटीया शेख हा पत्नीसोबत एमडी ड्रग्जची डिलिव्हरी करण्यासाठी आला असल्याची माहिती सुरत शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारावर पोलिसांनी चिमनी टेकडा येथील सलीम नगर झोपडपट्टीतील घर क्रमांक १४ च्या पहिल्या मजल्यावर छापा टाकून संशयीत ट्रक चालक एजाज उर्फ छोटिया उस्मान शेख याला अटक केली. १९.८७ लाख रुपये किमतीचे १९८.७६० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. यासोबतच एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण २० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पोलिसांच्या चौकशीत संशयित एजाज याने हे ड्रग्ज त्याचा नातेवाईक अबूझर उर्फ हाजी उर्फ जिलानी मुख्तार शेख याच्याकडून घेऊन आला होता. तो पत्नीसोबत जळगावहून ट्रेनने सुरत येथे ड्रग्जची डिलिव्हरी देण्यासाठी आला होता. परंतू डिलीव्हरी देण्यापुर्वी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे पोलिसांनी सांगितले.

ड्रग्ज पेडलर अबूझर उर्फ हाजी उर्फ जिलानी मुख्तार शेख हा जळगावातील एका गुन्ह्यात फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. ड्रग्जची तस्करी करणारा एजाज हा पकडला गेल्यामुळे पाठविणारा आणि मागविणारे दोघे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज पेडलर पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला आहे.

सुरतमध्ये झालेल्या ड्रग्ज कारवाईचे जळगावातील जिलानी सोबतचे कनेक्शन उघड झाल्यानंतर गुजरात पथक हे संशयिताला घेवून रविवारी जळगावात आले. त्यांनी एजाज याच्या मास्टर कॉलनीतील घराची झाडाझडती घेत ड्रग्ज पेडलर अबूझर उर्फ जिलानी मुख्तार शेख याच्याबाबत स्थानिक पोलिसांकडे देखील चौकशी केली त्यानंतर पथक हे सोमवारी सकाळी शाहू नगरात जावून त्यांनी ड्रग्ज कनेक्शनची माहिती जाणून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---