Gold Rate Update : सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, जीएसटीसह ओलांडला 1 लाख 13 हजारांचा टप्पा

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव बाजार पेठेत सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून, सोन्याच्या भावात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख नऊ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्याही भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख २६ हजार २०० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे आता एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह एक लाख १३ हजार १९७ रुपये, तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह एक लाख २९ हजार ९८६ रुपये मोजावे लागणार आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने १,०९,०६० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईत १,०९,२४० रुपये आहे. बेंगळुरूमध्ये सोने १,०९,३३० रुपये, कोलकातामध्ये ते १,०९,१०० रुपये आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक १,०९,५६० रुपये आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेनुसार, स्पॉट सोने प्रति औंस $३,६३३ वर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे, इंडियन बुलियन असोसिएशनवर चांदी १,२४,२५० रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत आहे. एक दिवस आधी मंगळवारी ते १,२५,२५० रुपये दराने विकले जात होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---