---Advertisement---
पाचोरा, प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरु झाली आहे.
पाचोरा- भडगाव विधानसभेतील शिक्षण क्षेत्रासह सहकारातील ज्येष्ठ नेते प्रताप पाटील व त्यांच्या कन्या जिल्हा दूध संघाच्या संचालिका तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका पूनम पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार विक्रांत पाटील, आमदार चित्रा वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपा नेते अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
आधी माजी आमदार दिलीप वाघ, ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी आणि आता प्रताप पाटील यांचा प्रवेश करून भारतीय जनता पार्टीने पाचोरा- भडगाव विधानसभेत मोठी ताकद व आव्हान विरोधकांसमोर निर्माण केले आहे.
पाचोरा- भडगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता पक्ष वाढीसाठी आखलेली रणनीती यशस्वी होताना दिसत आहे. तरी आगामी काळात देखील मतदारसंघातील काही मोठे चेहरे भारतीय जनता पार्टीत येण्याची शक्यता असल्याचे चर्चिली जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या प्रवेशा प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.