कुटुंब बाहेरगावी गेले अन् चोरट्यांनी साधली संधी, शिंपी व त्यांच्या मैत्रिणीचे साडेतीन लाखांचे दागिने केले लंपास

---Advertisement---

 

जळगाव : कुटुंब मुंबई व सुरत येथे गेलेले असताना चोरट्यांनी घरातून तीन लाख ५० हजार ७५० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना आयोध्यानगरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयोध्यानगरातील शिंपी कुटुंबीय २७ ऑगस्ट रोजी मुंबई व सुरत येथे गेले होते. त्यादरम्यान घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी घरातून तीन लाख ५० हजार ७५० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले.

चोरांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील आरती कृष्णा शिंपी (४९) व त्यांच्या मैत्रीण बेबाबाई खोडपे यांचे तीन लाख ५० हजार ७५० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले.

चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेजारील मंडळींनी शिंपी यांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी आरती शिंपी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि चंद्रकांत धनके करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---