जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता, हवामान अभ्यासकांनी वर्तविला अंदाज

---Advertisement---

 

जळगाव : गेल्या काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता ब्रेक घेतला आहे. दरम्यान, आज ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

जिल्ह्यात चार दिवसांपासून ढगाळ परंतु कोरडे हवामान आहे. गेल्या अकरा-तेरा दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचले असून जिल्हा परिसरात नदी नाले प्रवाहीत झाले आहेत.

बहुतांश ठिकाणी लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आले असून मध्यम प्रकल्पांचे आठ ते दहा दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. सद्यस्थितीत तापमान २९ ते ३० अंशादरम्यान असून हवेतील आर्द्रता ७५ ते ८० टक्केदरम्यान आहे.

दरम्यान, आज ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. जिल्ह्यात ११ सप्टेंबर रोजी कमाल तापमानात घट होऊन तापमान २९ अंशांवर येईल; मात्र १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान कमाल तापमान १ ते २ अंशाने वाढेल. १५ सप्टेंबरनंतर ढगाळ राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---