---Advertisement---
पाचोरा : आर्वे शिवारातील गट क्रमांक 27 गुरचरण जमिनीवरील बेकायदेशीर शाळेच्या बांधकाम प्रकरणी अखेर तुळजाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह निखिल दिलीप पाटील यांच्या विरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीची फिर्याद की, १२ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पूर्वी पाचोरा तालुक्यातील लोहारी बु.ग्रुप ग्राम पंचायत हद्दीतील आर्वे शिवारातील शासनाच्या मालकीच्या गट क्रमांक 27 मध्ये यातील 8 हेक्टर 64 आर या क्षेत्रामध्ये तुळजाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप मुकुंदराव पाटील व निखील दिलीप पाटील (दोन्ही रा. पाचोरा) यांनी शासकीय परवानगी न घेता, त्यांचा मालकी हक्क नसताना देखील बेकायदेशीरपणे शाळेचे बांधकाम केले. या बांधकासाठी त्यांनी वाळूची अवैध वापर करुन शाळेचे बांधकाम पूर्ण केले. यामुळे दोघांविरोधात पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये विविध कालमानसुनार मंडळ अधिकारी सुनील बापू पवार यांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फिर्यादीनुसार त्यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 कलम 303 (2), 316, 329 (1), व 329 (3), अनधिकृत प्रवेश व अतिक्रमण कलम 318 (4) फसवणूक कलम 324 (4) (5) शासकीय मालमत्तेचे नुकसान, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 कलम 50, 51, 53 व 57 शासनाच्या जमिनीवरील अतिक्रमण व बेदखल करण्याचे अधिकार पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 कलम 15 नुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर हे करीत आहेत. या कारवाई ने संपुर्ण पाचोरा तालुका परिसरात खळबळ उडाली आहे.
---Advertisement---