केळी दरात सुधारणा करा : मनसेची मागणी

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव जिल्हा हा प्रामुख्याने केळी पिकासाठी ओळखला जातो, परंतु, काही दिवसापासून केळीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात संगोपणासाठी खर्च करावा लागतो. त्यानंतर पिकाला चागंल्या प्रकारे तयार करता येते. परंतु, आज केळीला ४०० / ५०० रु. प्रती क्विटल दर दिला जात आहे त्यात मजुरी वजाकरता शेतकऱ्याच्या हातात ३०० ते ४०० दरानेच पैसे मिळत असल्याचे निदर्शनात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन केळी दरात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतरतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.

निवेदनाचा आशय असा की, केळी दरात सुधारणा केला गेला नाही तर शेतकऱ्याने आपल्या घराचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, मुलांचे शिक्षण कसे करायचे, मुला/मुलींचे लग्न कसे करावे अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांबाबत योग्य तो तपास करून त्याला या संकटातुन बाहेर काढावे. तसेच त्यांच्या केळी पिकाला योग्य तो भाव मिळवुन द्यावा.

सर्व केळी व्यापारी यांची बैठक घ्यावी केळी पिकाला हमीभाव जाहीर करावा. सर्व व्यापारी यांची नोंदणी करावी. प्रक्रिया उद्योग व साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे. विमा प्रक्रिया सोयिस्कर करण्यात यावी. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात केळी उत्पादकांचे मे आणि जून महिन्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकासोबत इतर पिकाचे नुकसान झाले होते तरीही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची भरपाई मिळालेली नाही.

ॲड जमील देशपांडे,जिल्हाध्यक्ष जळगाव,विनोद शिंदे महानगरध्यक्ष, अविनाश पाटील जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव, अशोक पाटील तालुका अध्यक्ष जामनेर, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा,उपमहानगरध्यक्ष,प्रदीप पाटील जळगाव ता. अध्यक्ष, रज्जाक सय्यद ,विलास सोनार,तालुका संघटक भुषण ठाकुर, दिपक राठोड,अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---