---Advertisement---
Gold Rate : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अर्थात सोन्याने आतापर्यंत सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोने १,११,४३० रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी १,२८,३८३ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. परिणामी ऐन सणासुदीत दागिने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
जळगाव सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोने प्रति तोळा १,०९,७०० रुपये, तर २२ कॅरेट सोने प्रति तोळा १,००,४८५ रूपांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, चांदी प्रति किलो १,२५,००० रुपयांवर पोहोचली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने १,११,४३० रुपये प्रति १० ग्रॅम दराने, २२ कॅरेट सोने १,०२,१५० रुपयांवर पोहोचले आहे, तर आर्थिक राजधानी मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने १,११,२८० रुपयांवर पोहोचले आहे. तर २२ कॅरेट सोने १,०२,००० रुपये दराने आहे.