---Advertisement---
जामनेर : देशातील कृषी उत्पादन वृद्धीसाठी प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय आवश्यकतेचे आहे. शिवार फेरीचे आयोजन तर्कसंगत कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीने कृषी तंत्रज्ञान हस्तांतरण व अवलंबामधील महत्वाचा पैलू आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्न होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरासह बाजारपेठेच्या मागणीनुसार शेती कौशल्य विकसित करणे काळाची गरज बनले आहे. या उद्देशाने जामनेर तालुक्यातील मौजे केकतनिंभोरा व चिंचखेडे बु येथे शिवर फेरीचे आयोजन करण्यात आले.
जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे अचूक सीमांकन करून त्यांना विशिष्ट क्रमांक देणे या उद्देशाने शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. या शिवार फेरीत गाव नकाशानुसार ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग तसेच शेतावर जाण्याचे मार्ग यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यामध्ये अतिक्रमण झालेल्या ठिकाणांची नोंद घेण्यात आली तसेच खुले रस्ते बाबत खात्री करण्यात आली. या उपक्रमात मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच ग्रामस्तरीय रस्ता आराखडा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या शिवार फेरीमुळे ग्रामीण रस्त्यांचे निश्चितीकरण होऊन भावी नियोजन व ग्रामविकासाच्या दृष्टीने अधिक पारदर्शकता निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले.