---Advertisement---
यावल : सर्वसामान्य प्रवाशांच्या जिव्हाळ्याची असलेली व आवडत्या लालपरी बसेसची अवस्था अतिश्य वाईट झाली आहे. यावल आगारातील भंगार बसेस मधून प्रवाशांचा जिवघेणा प्रवास करावा लागत आहे, एसटी महामंडळ हे मोठ्या अपघाताची वाट बघत आहे का ? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी व्यक्त करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घावे अशी अपेक्षा प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
यावल एसटी महामंडळाच्या आगारात जवळपास ४० ते ४५ एसटी बसेस या नादुस्त व भंगार जमा झालेल्या आहेत. या जुन्या झालेल्या बस गाड्यांचे वारंवार बसने अचानक पेट घेणे किंवा ब्रेक फेल होवुन अपघात होणे, यासारख्या घटना नियमित घडत आहेत. सुदैवाने आजपर्यंत एसटीबसच्या अपघातात जीवित हानी झालेली नाही. या नादुरुस्त गाड्यांमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
एसटी बसच्या अपघात घटनांमध्ये अद्यापपर्यंत प्रवाशांची मोठी जिवितहानी झालेली नाही, असे असले तरी प्रवाशांना आपला जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यागंभीर प्रश्नाकडे एसटी परिवहन महामंडळाने त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी करीत आहे
यावल एसटी आगातील नादुरूस्त व भंगार झालेल्या बसेसचा मुद्दा हा सातत्याने ऐरणीवर येत आहे. सर्वात सुरक्षित वाटणारा आपल्या लालपरी चा प्रवास हा धोकादायक वाटू लागला असून असे असतांना यावल आगाराचे व्यवस्थापक यांना परिवहन मंडळाच्या उत्पन्नात वाढ होणेसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिवहन मंडळाने या प्रवाशांशी निगडीत असलेल्या या अतिश्य गंभीर प्रश्नाकडे विभागीय नियंणत्रक यांनी तात्काळ लक्ष देवुन यावल बस आगारातींल नादुरुस्त व भंगार बसेसचा जिवघेणा प्रवास कायमचा बंद करावा अशी मागणी प्रवाशी वर्गातुन करण्यात येत आहे .