---Advertisement---
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी लग्न करुन तिला गर्भवती केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणात एका विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. असाच प्रकार अमळनेर तालुक्यात देखील घडला आहे. अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला पाच महिन्याची गर्भवती केल्याने अमळनेर तालुक्यातील भिलाली येथील महिलेच्या पतीविरुद्ध आशा कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ येथील आशा वर्कर नलिनी कैलास गवळी ह्या गरोदर मातांची नोंदणी करीत होत्या. यावेळी भवानी नगरमध्ये एका व्यक्तीने सांगितले की, माझी मुलगी पाच महिन्यांची गरोदर आहे. तिची नोंदणी करून घ्या. यानंतर आशा वर्कर महिलेने गरोदर महिलेला सोबत घेऊन धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथील सर्वोपचार केंद्र गाठले. यावेळी डॉक्टरांनी गरोदर महिलेची तपासणी केली, त्यात ती महिला १६ वर्षांची असल्याचे सांगितले.
दरम्यान , त्या मुलीकडून अधिकची माहिती घेतली असता तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न एक वर्षांपूर्वी अमळनेर तालुक्यातील भिलाली येथील समाधान कैलास सोनवणे याच्याशी लावून दिल्याचे सांगितले. त्याच्याशी शारीरिक संबंध झाल्याने ती गर्भवती झाल्याचे सांगितले. आशा वर्कर ने मुलीच्या आई वडिलांना घेऊन मोहाडी पोलीस स्टेशन, धुळे येथे पोक्सो कायदा कलम ४, ८ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (१),६४ (२) (एल) प्रमाणे समाधान सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शून्यनंबर ने तो अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.