---Advertisement---
जळगाव : नागपूर विद्यापीठाने व इतर विद्यापीठाने विधी व इतर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने कॅरी ऑन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने देखील इंजीनियरिंग, आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या विद्यार्थ्यांना शासनाने कॅरी ऑन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच अनुषंगाने विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना देखील या वर्षापासून कॅरी ऑन सुविधा देण्यात आली यावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेद्वारा करण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी यांना देण्यात आला आहे.
विध्यार्थ्याना कॅरी ऑनची सुविधा दिल्यास जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल आणि अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कधी कधी एका विषयामध्ये कमी गुण मिळाल्यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण होतो. हे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शैक्षणिक प्रगतीस अडथळा ठरते. कॅरी ऑन सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना पुढील वर्षात शिकण्याची संधी मिळेल.
विद्यापीठाने या संदर्भात योग्य ती कार्यवाही करून लगेच तात्काळ प्रभावाने नागपूर विद्यापीठाच्या धर्तीवर हा निर्णय लागू करावा अशी मागणी प्रथम व द्वितीय विधी शाखेतील विद्यार्थ्यांनी व सम्यक बिद्यार्थी आंदोलन संघटना केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतांना विक्की साळवे, जयवर्धन तायडे आदींच्या स्वाक्षरी आहे.