विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून मस्जिद-चर्चमध्ये नेल्याने खळबळ ; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

---Advertisement---

 

भुसावळ : येथे विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून धार्मिकस्थळी नेल्याने खळबळ उडाली आहे. सेंट ॲलॉयसिस स्कूलमधील विद्यार्थ्यांसंदर्भात हा प्रकार घडला आहे. यावर हिंदुत्ववादी संघटनांनी या शाळेत जाऊन जाब विचारला.

अधिक माहितीनुसार, शहरातील सेंट ॲलॉयसिस हायस्कूलने 11 सप्टेंबरला नववीच्या स्काउट, गाईडच्या विद्यार्थ्यांची शहरात धार्मिक सहल काढली. त्यात मुलींना स्कार्फ (हिजाबप्रमाणे चेहरा झाकून), तर मुलांना डोक्यावर रुमाल बांधून एका धार्मिकस्थळी नेण्यात आले. ही माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटना व पालकांनी शनिवारी शाळा गाठून जाब विचारला. धार्मिक सलोख्याच्या नावाखाली मुलांचे ब्रेनवॉश करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला.

गुरुवार ( 11 सप्टेंबर) शाळेतील सेंट अलॉयसिस स्कूलमधील आठवी, नववी व दहावीच्या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींची खाजगी वाहनातून धार्मिक सहल काढण्यात आली. ही सहल सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान पार पडली. या सहलीदरम्यान प्रथम स्थानिक शांतीनगर मधील शिव मंदिर हे विद्यार्थ्यांना बाहेरून दाखवण्यात आले व मंदिराविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यानंतर ही सहल गुरुद्वारांमध्ये नेण्यात आली. यावेळी देखील शिख धर्माबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही व बाहेरूनच दाखवण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांना भुसावळ सराफ बाजारातील मज्जिदमध्ये नेण्यात आले. या मज्जिदमध्ये मुस्लिम महिलांनाही प्रवेश दिला जात नाही अशा प्रार्थनास्थळात हिंदू धर्मातील मुलींना प्रवेश का ? देण्यात आला. याविद्यार्थींना प्रवेश देतांना हिजाब बांधायला लावला. विशेष म्हणजे, हिंदू विद्यार्थिनींना प्रवेश मिळावा यासाठी त्यांना चेहरा झाकण्यास भाग पाडण्यात आले. नंतर मौलानाने त्यांना धर्माबद्दल ज्ञान सांगितले. नमाजबद्दल माहिती देऊन पुस्तक दिले. इस्लाम धर्म आतंकवादी नसून आदर्श आहे असे पुस्तक वितरण करण्यात आले. यातून हे पूर्व नियोजन आखून ही धार्मिक सहल काढण्यात काम केलेले दिसत आहे

हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी सेंट ॲलॉयसिस शाळा गाठून प्राचार्या सिस्टर शिला व संबंधित शिक्षक अमोल दंदाले यांच्यासोबत चर्चा केली. शाळेतील स्काउट गाइडच्या विद्यार्थ्यांसाठी धार्मिक सलोखा सहल काढण्यात आली. यासाठी मुलांकडून 100 रुपये शुल्क घेतले. मात्र, मुलींना चेहऱ्यावर स्कार्फ बांधून तर मुलांना डोक्यावर रुमाल बांधून धार्मिकस्थळी का नेले? त्याप्रमाणे मंदिरात जाताना मुलांच्या कपाळावर तिलक का केला नाही? अशी विचारणा केली. यावेळी श्याम दरगड, भारती वैष्णव, शिवसेनेचे दीपक घांडे, भाजपचे शिशीर जावळे उपस्थित होते. त्यांनी कारवाईची मागणी केली.

चर्चेदरम्यान मुख्याध्यापकांनी पाळले मौन


संबंधित शिक्षकाने आधी या प्रकरणावर त्यांचं काहीही चुकलं नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, संघटनांनी प्रश्नांची सरबती केल्यानंतर माफी मागितली. हा सर्व प्रकार सुरू असताना शाळेच्या मुख्याध्यापकांनी मौन पाळले. या प्रकाराबाबत बाजू जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता शाळा व्यवस्थापनासोबत संपर्क झाला नाही.

कुणाचीही फिर्याद नाही


‌‘हे सर्व स्काऊटची विद्यार्थी आहेत. त्यांना सर्व धार्मिक स्थळे दाखवण्याचा हा शैक्षणिक क्षेत्राचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यात धार्मिक मने दुखावणे किंवा अवमान होणे असा कोणताही उद्देश नाही. याबाबत कोणाची फिर्यादही नाही, परिणामी गुन्हा दाखल नाही,‌’ असे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी ‌‘तरुण भारत‌’ला सांगितले.


धार्मिक ठिकाणी सहल न्यायची होती तर स्वामीनारायण मंदिर होते विठ्ठल मंदिर होते राम मंदिर होते गजानन मंदिर होते या ठिकाणी का नेले नाही. मुख्याध्यापक व शिक्षकाने जाणीवपूर्वक ख्रिश्चन व मुस्लिम धर्माचा मुलांवर प्रभाव पडावा यासाठीच फक्त चर्चच्या पादरी व मुस्लिम मधील मौलानाशीच भेट घालून दिली. तसेच हिंदूंच्या मंदिरात व गुरुद्वारामध्ये तेथील धर्म गुरुजींची का भेट करून देण्यात आली नाही असे नागरिकांमध्ये खूप संताप लाट आलेली आह

दरम्यान, भुसावळचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी सेंट अलॉयसिस स्कूल ने या सद्भावना सहली बाबत गट शिक्षणाधिकारी याची कुठलीही परवानगी घेतली नाही. आम्हाला याची कोणती कल्पना नसल्याचे स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---