---Advertisement---
जामनेर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण निघाल्यानंतर येत्या दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यातून ५० ते ५५ सदस्य निवडून आणण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ते शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा पंधरवाडा जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळे’ त बोलत होते. केंद्रीय युवा व क्रीडामंत्री रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर होते.
मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी पुढे सांगितले की, सेवा पंधरवड्यात कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन शासकीय योजनांची माहिती द्यावी. जास्तीतजास्त युवक भाजपशी जोडले जावे यासाठी काम करावे असे आवाहन केले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की, येत्या २१ रोजी भुसावळ येथे नमो मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. स्वदेशीचा केवळ नारा देऊन चालणार नाही तर प्रत्येकाने स्वदेशी वस्तुंचाच वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले.
आमदार राजू भोळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, संगठन मंत्री डॉ. राजेंद्र फडके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, डॉ. केतकी पाटील,जितेंद्र पाटील, आतिष झाल्टे,जे.के.चव्हाण, डॉ. प्रशांत भोंडे, रवींद्र झाल्टे,संजय गरुड, एड. शिवाजी सोनार, नवल पाटील परीक्षित बर्हाटे, छगन झाल्टे कार्यकर्ते उपस्थित होते.