---Advertisement---
तळोदा : शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओवरून सत्ताधाऱ्यांची चांगली नाचक्की होत आहे. दरम्यान, आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा शहरात केलेल्या रस्त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करून विरोधकांच्या व्हिडीओ काऊटर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरात नागरिकांमध्ये राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
विरोधकानी शहरातील गल्ली-बोळात असलेल्या खड्ड्यांमुळे शहरातील नागरिक कसे त्रस्त झाले आहेत ते व्हिडीओच्या माध्यमातून दाखून आदिवासी भाषेतील रोडाली म्हणून राजेश पडावी यांना निवडून आणण्याचे आवाहन करणारा विधानसभा निवडणूकी दरम्यान च्या गाण्याचे विषय घेवून शहरातील खड्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
यामुळे सत्ताधारी भाजपाची चांगली नाच्चकी झाली आहे. या व्हिडीओला काऊटर म्हणून भाजपाकडून एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला. त्यात नव्याने बांधण्यात आलेल्या हातोडा रस्त्याचे तसेच वाणी गल्लीतील रस्त्याच्या व्हिडीओ दाखवून आमदार पाडवी यांनी शहरासाठी केल्या रस्त्याच्या कार्याच्या गुणगाण करण्यात आले आहे.
---Advertisement---
परतू ,शहरातील गल्ली-बोळ, मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना किती त्रास होत आहे हे चित्रीत करण्यात आलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर मात्र चांगलाच ट्रेड करत आहे.