शहादा येथे घरफोडी; ९४ हजार रुपयांचे दागिने लंपास

---Advertisement---

 

शहादा : येथील नेताजी हायस्कूलजवळ असलेल्या मनीषानगरमध्ये एका शिक्षकाच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी ९४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

राहुल रमेश पवार (वय ३९), हे प्राथमिक शिक्षक मनीषानगर, प्लॉट क्र. ४४, येथे राहतात. ते १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते १४ सप्टेंबर रोजी रात्री ९ या वेळेत बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लोखंडी गेटचे आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेल्या काळ्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये ५२ शे रुपये किमतीची १३ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १२ शे रुपयांची ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १० हजार रुपयांची २ ग्रॅमची डायमंडची अंगठी, आणि २० हजार रुपयांच्या ५ ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या यांचा समावेश आहे. चोरट्यांनी एकूण ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

घटनेची माहिती मिळाल्यावर पवार यांनी १५ सप्टेंबर रोजी रात्री शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घरफोडिचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पो. नि. निलेश देसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग राजपूत करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---