---Advertisement---
पाचोरा, प्रतिनिधी : तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरे, वानेगाव, वाडी-शेवाळे यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला. डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने गावांमध्ये शिरकाव करत घरांचे, शेतीचे तसेच गुराढोरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पूरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली असून घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचेही प्राथमिक अहवालात समोर आले आहे.
या गंभीर परिस्थितीची आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र युवा नेते सुमित किशोर पाटील यांनी पूरग्रस्त गावांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतकरी व महिलांची विचारपूस केली. तसेच शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या दौऱ्यात जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे,तहसीलदार विजय बनसोडे, माजी आमदार दिलीप वाघ,वैशाली सूर्यवंशी,शहर प्रमुख सुमित सावंत, तसेच शेतकरी सेना प्रमुख सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी गावकऱ्यांकडून करण्यात आली. पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
नुकसान झालेल्या गावांची नावे
शिंदाड, सातगाव (डोंगरी), निंभोरी, वानेगाव, वडगाव कडे, वेरूली, राजुरी, पिंप्री, गहुले वाडी शेवाळे, खडकदेवळा
1) मनुष्यहानी :-0
मृतांची संख्या :-0
जखमी :-0
2) प्राणी हानी:- 1879
मयत मोठे दुधाळ जनावरे :- 90
मयत लहान दुधाळ जनावरे:- 128
जखमी दुधाळ जनावरे:-7
ओढकाम करणारी मोठी जनावरे-:- 23
ओढकाम करणारी लहान जनावरे:- 41
कोंबड्या- 1572 ( 1050 कोंबड्या वाहून गेले आहेत )
पाळीव डुक्कर-25
अनेक जनावरे पुरा मध्ये वाहून गेलेले आहेत, त्यांच्या बॉडी अजून पर्यंत मिळून आलेल्या नाहीत.
3) 2 दिवसापेक्षा अतिवृष्टीमुळे/पुरामुळे बाधित कालावधी करिता असलेल्या कुटुंबाची संख्या :- 361
4) घरांचे नुकसान पूर्णत:-
कच्ची घरे-56
पक्की घरे- 0
5) घरांचे नुकसान अंशतः-
कच्ची घरे- 248
पक्की घरे- 25
6) नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या- 32
7) नष्ट झालेल्या गोठ्यांची संख्या- 54
सदर आकडेवारी ही प्राथमिक स्वरूपाची असून पंचनामा अंती सदर आकडेवारी मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.