---Advertisement---
Gold Price Today : आज बुधवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात एमसीएक्सवर सोने ०.२३ टक्क्यांनी घसरून १,०९,९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले, तर चांदीही १.०२ टक्क्यांनी घसरून १,२७,५०३ रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.
जळगाव सुवर्णपेठेत २२ कॅरेट सोने दर विनाजीएसटी १०१२२० ( जीएसटीसह १०४२५६) रुपये प्रति १० ग्रॅम, तर २४ कॅरेट सोने दर १,१०,५०० (जीएसटीसह १,१३,८१५) रुपये इतका आहे. तर, चांदी दर विनाजीएसटी १,२९,००० (१,३२,८७०) रुपये इतका आहे.
दिल्लीत २४ कॅरेट सोने १,११,८६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १,०२,५५० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे. तर चांदी १,२७,८०० रुपये प्रति किलोग्रॅम आहे.
मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,११,७१० रुपये आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०२,४०० रुपये आहे. या शहरांमध्ये चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम ₹१,२७,५०० आहे.
अहमदाबाद आणि पटनामध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ₹१,११,७६० आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ₹१,०२,४५० या दराने आहे. या शहरांमध्ये चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम ₹१,२७,६०० आहे.