---Advertisement---
जळगाव : कामावर जातो असे सांगून घराबाहेर एक तरुण घराबाहेर पडला होता. रेल्वेच्या धडकेत शनिवारी (१३ सप्टेंबर) तो मरण पावला. या अनोळखी तरुणाची दोन दिवसांनी ओळख पटली. ही घटना शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. दरम्यान, दोन दिवसांपासून हा तरुण घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी हरविल्याची तक्रार पोलिसांत केली होती. यानंतर या तरुणाची ओळख पटली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाश सुरेश सपकाळे (वय २६, रा. कांचननगर, ह. मु. प्रजापत नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. आकाशच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.
शहरातील जळगाव ते भादली दरम्यान असलेल्या अपलाईनवरील शनिवारी (१३ सप्टेंबर) खांबा क्रमांक ४२०/३० च्यामध्ये रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासधिकारी पोहेकों प्रदीप नन्नवरे हे सोशल मीडियासह शहरात बेपत्ता असलेल्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत होते.
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आकाशचा मृतदेहच समोर दिसल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुका पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी ( १५ सप्टेंबर) आकाश सुरेश सपकाळे हा तरुण बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती प्रदीप नन्नवरे यांना मिळाली.
त्यांनी लागलीच सपकाळे कुटुंबियांसोबत संपर्क साधून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बोलावले. त्याठिकाणी मयताच्या अंगावरील शर्ट व त्याच्या हातावर गोंदलेल्या आई नावावरुन आकाशच्या काकांसह भावाने त्याची ओळख पटवली.