Jamner : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर

---Advertisement---

 

जामनेर : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्यास तहसील कार्यालयात सुरुवात झाली.

तहसील कार्यालयात झालेल्या सेवा पंंधरवाड्याचा शुभारंभ तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी शपथ दिली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 104 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या मोहिमेंतर्गत महिला आरोग्यविषयी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. महिला व बालविकास अधिकारी सुशीला पाटील यांनी पोषण अभियान अंतर्गत सर्वांना शपथ दिली. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित एनडीआरएफ पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ व पथकातील सदस्यांनी मॉक ड्रिल प्रशिक्षण घेऊन आपत्ती काळातील कार्यपद्धतीची माहिती दिली.

भारतीय जनता पक्षातर्फे घेण्यात या आलेल्या रक्तदान शिबिराला नगराध्यक्ष साधना महाजन यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर , ए. के. चव्हाण, नगरसेवक डॉ. प्रशांत भोंडे, अतिश झाल्टे, दीपक तायडे, रवींद्र झाल्टे, बाबुराव हिवराळे, योगेश मोते, डॉ. संजीव पाटील, सुभाष पवार, कैलास पालवे, अनिस शेख तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबत जामनेर तालुक्यात विविध उपक्रम राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---