दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार : वराडसीम येथे दारू भट्टीची तोडफोड

---Advertisement---

 

भुसावळ : दारूबंदीचा ग्रामसभेचा ठराव असतानाही दारू विक्री सुरुच असल्याने जोगलखोरी येथील महिलांनी संतप्त होऊन वराडसीम येथे धडक देत अवैध दारू भट्टीवर धाड टाकली. त्यांनी दारूच्या टाक्या व साहित्य गोळा करून ते बाजार ओट्यावर जमा केले व याची माहिती पोलिसांना दिली.

महिलांनी ‘दारू बंद झालीच पाहिजे’ असा निर्धार करत गावातील अवैध दारू विक्रीवर रोष व्यक्त केला. त्यांनी दारू विक्री करणाऱ्याच्या ठिकाणी जाऊन दारूचे साहित्य नष्ट केले. त्यानंतर हे संपूर्ण साहित्य बाजारातील ओट्यावर आणून ठेवले व भुसावळ तालुका पोलिस स्टेशनशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच पीएसआय कंखरे यांनी त्वरित घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी गुप्तवार्ता विभागाचे कर्मचारी विनोद पाटील, सचिन पारधी, पोलीस पाटील, सचिन वायकोळे तसेच गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ महेंद्र सपकाळे, कैलाश शेकोकारे, मनोज राणे, प्रकाश कुंभार आणि वराडसीम व जोगलखोरी येथील अनेक महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.

या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली असून दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायतीने आधीच दारूबंदीचा ठराव मंजूर केला असून आता ग्रामस्थांनीही यावर कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

गावकऱ्यांचा निर्धार


“गावातल्या पुढच्या पिढीचं भवितव्य वाचवायचं असेल, तर दारूबंदी ही काळाची गरज आहे,” अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. आता पुढील कारवाईसाठी पोलीस तपास सुरू आहे. वराडसीम आणि परिसरात दारूबंदीसाठी महिला पुढे सरसावल्याने सामाजिक जनजागृतीचा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---