वाळूचा अवैध उपसा : ग्रामसभेत मांडळ ग्रामस्थ आक्रमक

---Advertisement---

 

अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा वाळूच्या अवैध होणाऱ्या उपशाचा मुद्दा चांगलाच तापला. या अवैध वाळू विरोधात ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी ग्रामस्थांनी तहसीलदार रूपेश सुराणा यांना चांगलेच धारेवर धरले. गंभीर बाब म्हणजे ग्रामस्थांनी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप केला.

अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीतून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करण्यात येत असून यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी तहसीलदार सुराणा यांच्यासमोर आपली बाजू मांडली. रात्री-अपरात्री वाळूने भरलेले ट्रॅक्टर आणि डंपर बेधडकपणे धावत असतात, त्यामुळे गावातील शांतता भंग पावली आहे. या अवैध वाहतुकीमुळे रस्ते खराब होत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे. वाळू माफियांना प्रशासनाचा धाक नसल्याचे दिसून येत आहे.

. वाळू चोरट्यांच्या डोक्यावर वरिष्ठांचा वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला. तसेच हफ्ते घेतल्यामुळे प्रशासन कारवाई करत नाही का ? असा खडा सवाल ग्रामस्थांनी तहसीलदारांना विचारला. तसेच अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात आला. वाळूचा अवैध उपसा तात्काळ थांबवून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली. तहसीलदार सुराणा यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या घटनेमुळे अवैध वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .

सरपंच कविता दीपक बडगुजर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, गेल्या सहा आठ महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु आहे. यासंदर्भात अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई न झाल्याने ग्रामसभेच्या वेळी ग्रामस्थांचा उद्रेक झाला. आतातरी प्रशासनाने वाळू माफियांना आवार घालावा अन्यथा पांझरा काठावरील गावागावात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---