जळगावात महावितरण प्रशासनाच्या पुनर्रचना प्रस्तावाचा द्वार सभा घेऊन निषेध

---Advertisement---

 

जळगाव : महावितरण प्रशासनाने २२ सप्टेंबरपासून पुनर्रचना प्रस्तावाची एकतर्फी अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे. या प्रस्तावात कृती समितीत सहभागी संघटनांनी दिलेल्या सूचना व प्रस्तावाचा कोणताही अंतर्भाव करण्यात आला नाही. या एकतर्फी अंमलबजावणी विरोधात वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीतील संघटनांनी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) जळगाव परिमंडळासमोर द्वार सभा घेऊन तीव्र निदर्शने करुन निषेध व्यक्त केला.

यात आंदोलनात वीज कर्मचारी,अभियंते, अधिकारी कृती समितीचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी कृती समितीतील संघटनेचे पदाधिकारी सभासदांनी काळ्याफिती लावून मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव परिमंडळातील धुळे नंदुरबार सर्कल समोर सुद्धा पदाधिकारी सभासदांनी मोठ्या संख्येने द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी पुनर्रचनेच्या माध्यमातून खाजगीकरण करण्याचा प्रशासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी एकजुटीने हाणून पाडू असा इशारा देण्यात आला. झोनसचिव कॉ, डी. एन. सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी आंदोलकांत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबऑर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, तांत्रिक कामगार युनियन५०५९ या सहकारी संघटनेच्या कर्मचारी, अभियंते,अधिकारी यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---