---Advertisement---
नंदुरबार : दोन दिवसांपूर्वी शहरात व्यापारी संकुलन परिसरात एका आदिवासी तरुणाचा चाकूने वार करुन खून करण्यात आला. हा खून किरकोळ कारणातून झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात पडत आहेत. याप्रकाणामुळे आदिवासी समाजबांधवांमध्ये असंतोष वाढला आहे. या हत्याकांडातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी या मागणी करुन नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
किरकोळ वादातून नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भैय्या मराठे नामक युवकाने जय भिल या तरुणावर चाकुने प्राणघातक हल्ला केला होता. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी सुरत येथे हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर आदिवासी समाज बांधव आक्रमक झाला असून घटनेच्या तिसऱ्या दिवशी देखील नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.
नंदुरबार शहरात किरकोळ वादावरून जय भील याची हत्या झाली. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. परंतु, या घटनेने आदिवासी संघटना आक्रमक झाल्यापासून त्यांनी या हत्येचा निषेध व्यक्त केला आहे. आदिवासी बांधवांनी आज जिल्हा बंद पुकारला आहे. जिल्हा बंदची हाक दिल्याने व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.
आदिवासी तरुणाची किरकोळ वादावरून हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. आदिवासी समाज बांधवांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी केली आहे. यानंतर पोलीस देखील ऍक्शन मोडमध्ये आले असून अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आज त्याची शहरातून धिंड काढण्यात आली आहे.