---Advertisement---
Navratri Festival 2025 : देवीची घटस्थापना होऊन सोमवारी (२२ सप्टेंबर ) नवरात्रोत्सवाला सर्वत्र मंगलमय वातावरणात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवाची सांगता गुरुवारी (२ ऑक्टोबर ) विजया दशमीला होणार आहे. या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपाची आराधना केली जाते. शिवाय, प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट असा रंग असतो. नवरात्रीच्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत हे जाणून घ्या..
या वर्षीच्या नवरात्रीत नऊ रंगाचे वस्त्र परिधान करण्यात येईल. या नऊ रंगांमध्ये हिरवा, पिवळा, राखाडी, निळा, आकाशी निळा, नारंगी, लाल आणि पांढरा रंगाचा समावेश आहे. या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत ते जाणून घेऊ या..
नवरात्रीच्या या ९ रंगांचे हे आहेत वैशिट्ये
आज पहिल्या दिवशी ‘२२ सप्टेंबर’ प्रतिपदा तिथीला, देवी शैलपुत्रीला विशेष प्रार्थना केली जाते. विशेष या दिवशी पांढरा पोशाख घालणे शुभ मानले जाते.
दुसऱ्या दिवशी ‘२३ सप्टेंबर’ हा ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी लाल पोशाख शुभ मानले जाते.
तिसऱ्या दिवशी ‘२४ सप्टेंबर’ रोजी देवी चंद्रघंटा यांचे पूजन केले जाते. या दिवशी गडद निळा पोशाख परिधान करणे शुभ मानले जाते.
चौथ्या दिवशी ‘२५ सप्टेंबर’ या वर्षी चतुर्थी तिथी दोन दिवसांवर येते. चौथ्या दिवशी पिवळा पोशाख परिधान करावा.
‘२६ सप्टेंबर’ ‘ रोजी नवरात्रीची चतुर्थी तिथी देवी कुष्मांडा यांना समर्पित आहे. या दिवशी हिरवा पोशाख परिधान करणे शुभ मानले जाते.
पाचव्या दिवशी ‘२७ सप्टेंबर’ देवी स्कंदमातेचे पूजन केले जाते. या दिवशी राखाडी वस्त्र परिधान करणे शुभ असते.
सहाव्या दिवशी ‘२८ सप्टेंबर” देवी कात्यायनीचे आराधना करण्यात येते. या दिवशी केशरी रंगाचे कपडे घालणे शुभ असते.
सातव्या दिवशी ‘२९ सप्टेंबर” देवी कालरात्रीचे पूजन केले जाते. या दिवशी मोरपंख हिरवा रंग परिधान करणे शुभ मानले जाते.
आठव्या दिवशी ‘३० सप्टेंबर’ देवी महागौरीची आराधना करण्यात येते. महाअष्टमी पूजा खूप महत्वाची आहे. या दिवशी गुलाबी रंग कपडे घालणे हे शुभ मानले जाते.
नवव्या दिवशी ‘१ ऑक्टोबर’ देवी सिद्धिदात्रीचे पूजन करण्यात येते. या दिवशी नवरात्रीचा समारोप होतो. या दिवशी जांभळा रंग शुभ मानण्यात येते.