Video : पाचोरा शहरासह तालुक्यातील नुकसानीची मंत्र्यांनी केली पाहणी

---Advertisement---

 

पाचोरा : रविवारच्या (२१ सप्टेंबर) मध्यरात्रीपासून अतिवृष्टीमुळे हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे पाचोरा शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील या नुकसानग्रस्त भागाची पाहणी यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत आ. किशोर पाटील, जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पाचोरा शहरातील जनता वसाहत बहिरम नगर यासह अन्य भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. नदीचे पाणी घरात शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा गाळण, नाचनखेडा याचा इतर गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचे पाहणी करून तात्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार किशोर पाटील यांनी मागणी केली.

पाचोरा शहरासह तालुक्यात अतिवृष्टी झाली. ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाचोरा शहरातील अनेक गल्लीनमध्ये पुराचे पाणी आले आहे. घरांमध्ये पाणी गेले आहे. यात खूप मोठे नुकसान झाले आहे. यात शहरासह ग्रामीण भागात नुकसानीचा समावेश आहे. या सर्व नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले असल्याचे ना. गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

आम्ही झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. झालेल्या नुकसानीचे शासकीय नियमाप्रमाणे जो लाभ मिळतो तो तात्काळ मिळावा यासाठी उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबरा पाटील यांनी यावेळी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---