Gold Rate : सोन्यासह चांदीच्या भावात एकाच दिवशी ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या दर

---Advertisement---

 

Gold Rate : जागतिक तेजीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम २,२०० रुपयांनी वाढून १,१६,२०० रुपयांवर पोहोचले आहे. ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने शुक्रवारी १,१४,००० रुपयांवर बंद झाले होते.

९९.५ टक्के शुद्धतेचे सोनेही २,१५० रुपयांनी वाढून १,१५,६५० रुपयांवर पोहोचले. चालू वर्षात सोन्याने ३७,२५० रुपयांची म्हणजेच ४७.१८ टक्के वाढ नोंदविली आहे. दरम्यान, चांदीचा भावही ४,३८० रुपयांनी वाढून प्रति किलो १,३६,३८० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यावर्षी चांदीच्या भावाने ४६,६८० रुपयांची, म्हणजेच ५२.०४ टक्क्यांची उसळी घेतली आहे.

गुरुग्राम, लखनौ आणि जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१३,२३० रुपये आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०३,८१० रुपये आहे. मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, बेंगळुरू, पटना, भुवनेश्वर आणि हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१३,०८० रुपये आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०३,६६० रुपये आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---