---Advertisement---
जळगाव : तालुक्यात अवैधरित्या सुरु असलेल्या गौण खनिज (वाळू, मुरुम) ही तात्काळ ५ दिवसाचे आत थांबविण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी (२३ सप्टेंबर ) देण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज व वाळूचा अवैध उपसा सुरु करुन सर्रासपणे विक्री होत आहे. ही वाळू अवैधरित्या धानोरा, म्हसावद, आव्हाणे, खेडी आदी गावातून गिरणा नदीच्या पात्रातून अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या मार्फत रात्रीच्या सुमारास साधारणत रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेमध्ये बेसुमारपणे उपसा केला जातो. हा गैरप्रकार वाळू माफिया हे संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग, तलाठी, मंडळाधिकारी, तहसिलदार, प्रांत, प्रांताधिकारी या सर्वांना हाताशी धरुन राजेरोसपणे करीत आहेत.
वाळूच्या अवैध वाहतुकीमुळे शेतरस्त्याचे सुध्दा नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे तापी पाटबंधारे विभागाने कांताई विभागाने पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधला आहे. येथे मोठ्या जड वाहनांना प्रवेश बंदी असतांना देखील रात्रीच्या वेळी ९ ते पहाटे ५ या वेळेत धरणावर हायवे डंम्परद्वारा सर्रासपणे वाळू वाहतकू केली जात आहे.
धानोरा गावावरुन जाणारे शाळेकरी विद्यार्थी जळगाव ते धानोरा, मोहाडी या ठिकाणाहून सायकलीने वापरीत असतात. व याच रस्त्यावर वाळू वाहतूक करणारे डंम्पर, हायवा डंम्पर, ट्रॅक्टर या वाहनांतून सुसाट वेगाने वाळूची वाहतूक केली जात आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा या वाहनाद्वारे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
तरी संबंधित वाळू उपसा व गौण खनिज अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर तात्काळ ५ दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाच दिवसानंतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी जळगाव महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगर अध्यक्ष प्रकाश जोशी, उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा, जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना अविनाश पाटील, ॲड. सागर शिंपी, शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
---Advertisement---