तळोद्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्रीदुर्गामाता दौड

---Advertisement---

 

तळोदा : सन २०१५ पासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रोत्सव काळात दहा दिवस श्रीदुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी देखील दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी भगवा फेटा, पांढऱ्या टोपीसह सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना ते विजयादशमी दरम्यान सकाळी भल्या पहाटे भगव्या झेंड्याच्या नेतृत्वाखाली श्रीदुर्गामाला दौडचे आयोजन केले आहे. यावर्षीही शहरातील विविध भागात व ग्रामीण भागात प्रतापपुर येथे सलग दहा दिवस दौड निघेल. तर विजयादशमीच्या दिवशी विशेष दौड काढली जाणार आहे. या दौडमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थानतर्फे करण्यात आले आहे. सन २०१५ पासून सुरू झालेली ही परंपरा आता उत्साहात रुजली आहे.

राष्ट्रभक्तीची भावना जनतेत जागृत व्हावी, देशभक्ती वृद्धिंगत व्हावी, तसेच आदिशक्ती भगवतीपाशी सामूहिक प्रार्थनेचा संकल्प व्यक्त व्हावा, या उद्देशाने दौडचे आयोजन केले जाते. सहभागी बांधवांनी भगवा फेटा किंवा पांढरी वारकरी टोपी परिधान करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शहरात पहिल्या दिवशी दौडला ठाणेदार गल्ली परिसर येथून २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता प्रारंभ झाला आह. सुरू होवुन २३ ते सप्टेंबर ते २ आक्टोबर दरम्यान भोई गल्ली,लक्ष्मीमाता मंदीर,काकाशेठ गल्ली,नविन वसाहती,मोठा माळीवाडा, महाविद्यालय रोड,दत्त मंदिर,मराठा चौक,अशा दहा ठिकाणी दररोज सकाळी काढली जाणार आहे.दररोजचे नियोजन एक दिवस आधी कळविण्यात येईल असे आयोजकांनी कळविले आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---